Skip to main content

दिवाळी अंक - साप्ताहिक शिक्षक ध्येय

 


संपादकीय...

आली माझ्या घरी ही दिवाळी...  

    

          दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव! दरवर्षी आपण सर्व मोठ्या उत्साहाने दिवाळी सण साजरा करीत असतो. पण या वर्षी थोडे नियम पाळत ह्या सणाचा आनंद आपल्याला लुटायचा आहे.

दिवाळी साऱ्या जगभर प्रकाशाचा सण म्हणून साजरी केली जाते. अंधारावर उजेडाच्या आणि अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचा हा सण आहे.

          फराळ, फटाके, आकाशकंदील, रांगोळी, दिवे, पणत्या, लायटिंग आदि नेहमीप्रमाणेच साजरे करू या...

यंदा दिवाळीत आपण वाचनाचा देखील आनंद लुटू या...

आपला दिवाळी उत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आम्ही आपणासाठी घेऊन येत आहोत... शिक्षक ध्येयचा “दिवाळी अंक”. आपल्याच अनमोल सहकार्यातून निर्माण झालेला एक दर्जेदार, वाचनीय आणि संग्रही असा दिवाळी अंक...

यंदा दिवाळी अंकात वाचा...अंधारातून प्रकाशाकडे नेणारा सण दीपावली; दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा; आशेचा प्रकाश एकतेचा सण दिवाळी; दिवाळी लक्ष्मीपूजन; धावपळीतील ओवाळणी; दिवाळी आणि भारतीय संस्कृती; आकाशकंदील का लावला जातो?; दिवाळीच्या आठवणी; रांगोळी; विविध कौशल्य आत्मसात करणे: काळाची गरज; प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करु या; लहानपण देगा देवा; अल्फ्रेड नोबेल; तिमिरातूनि तेजाकडे; पाढे बनविण्याची नवीन सोपी पद्धत; पाककृती अनारसे; पारितोषिक प्राप्त उपक्रम, कविता, विनोद, बालचित्रे, दिवाळी स्पेशल रांगोळी, सरकारी नोकरीच्या विविध जाहिराती आणि बरेच काही...  आमच्या शिक्षक बांधवांच्या लेखणीतून...  वाचायलाच हवा असा अप्रतिम अंक आपल्या सर्वांच्या सहकार्यातून आकारास आला आहे...

विद्यार्थी आणि शिक्षकांनी अपडेट राहण्यासाठी वाचन करायलाच हवे...  कारण शरीराला जशी व्यायामाची गरज असते तशी मनाला वाचनाची. यंदा या दिवाळी अंकाचे वाचन करून स्वत:ला सिद्ध करू या...

आपले एक हक्काचे व्यासपीठ... नेहमीच...

संपादकीय मंडळ 

https://www.shikshakdhyey.co.in/

Popular posts from this blog

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा २०२४

  राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा   राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन! विजेत्यांना पारितोषिक , बालदिनी निकाल   शिक्षक ध्येय, रोटरी क्लब ऑफ यवतमाळ आणि रामशेज शिक्षण संस्था आशेवाडी, तालुका  दिंडोरी जिल्हा नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ‘ ऑनलाइन चित्रकला स्पर्धा – २०२४ ’ साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ ना नफा ना तोटा ’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून विद्यार्थ्यांना चित्र काढण्यासाठी प्रोत्साहन देणे , त्यांच्या कलेचे कौतुक करणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.    ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक , पालक व विद्यार्थी वाचक वर्ग आहे. स्पर्धा आयोजनाचे हे पाचवे वर्ष आहे. राज्यातील विद्यार्थ्यांमधून तीन गटात ही ऑनलाइन चित्रकला स्पर्धा घेतली जाणार आहे. अ गट (इयत्ता पहिली ते पाचवी) ब गट (इयत्ता सहावी ते दहावी)   क गट (इयत्ता अकरावी ते पदवी)          विद्यार्थ्यांमध्...

आदिवासी विकास विभागाची नवीन जाहिरात प्रसिद्ध

  आदिवासी विकास विभागाची नवीन जाहिरात प्रसिद्ध   महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागात आदिवासी विकास निरीक्षक, संशोधन सहायक, लिपिक, शिक्षण विस्तार अधिकारी, अधीक्षक - पुरुष, स्त्री, गृहपाल, ग्रंथपाल, लघुलेखक, प्रोजेक्टर ऑपरेटर इत्यादी विविध पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. आदिवासी विकास विभाग भरती जाहिरात अर्ज सुरवात 12/10/24 शेवटची दिनांक 12/11/2024 जाहिरात काळजीपूर्वक वाचावी...  CLICK HERE.. अर्ज करण्याची लिंक... https://ibpsonline.ibps.in/tdcsep24/ 🪀 मोफत जाहिराती मिळवा.. https://chat.whatsapp.com/JpSNAYKPXA4AyrH2PaKgu0 क्लास प्लस ॲप स्पर्धा परीक्षेसाठी... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

राज्यातील महिलांसाठी कर्तृत्ववान महिला पुरस्कार 2025

  राज्यातील महिलां साठी   कर्तृत्ववान महिला पुरस्कार 2025 राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन ८ मार्च २०२५ जागतिक महिला दिनी निकाल होणार जाहीर शिक्षक ध्येय, मातृसेवा फाउंडेशन ठाणे, श्री. मिलिंद दीक्षित वर्धा, श्री. विलास व्हटकर मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील महिलांसाठी ' कर्तृत्ववान महिला पुरस्कारासाठी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून महिलांच्या कार्याला प्रोत्साहन देणे हाच या स्पर्धेमागील उद्देश आहे.   ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक , पालक आणि विद्यार्थी वाचक आहेत. महिलांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती राज्यातील इतर सर्व नागरिकांना व्हावी याच हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नाविन्यपूर्ण प्रयोगाच्या आधारावर उपक्रमाची निवड केली जाणार असून महिलांच्या कार्याला उत्तेजन देणे , त्यांचे कौतुक करून , प्रोत्साहना सह त्यांच्यातील कर्तृत्व वाढीस लावणे हा या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे. उपक्रम/प्रस्ताव अहवाल लेखनात खालील मुद्दे समा...