Skip to main content

साप्ताहिक शिक्षक ध्येय 11 डिसेंबर 2023

 



संपादकीय...

 

 

मोक्षाकडे जाणारा प्रवास...

                 

            आयुष्यात घडणारी प्रत्येक घटना अथवा प्रत्येक जीवाशी या जन्मात घडलेली इथली भेट ही आपले कार्मिक अकाऊंट्स क्लीअर करण्यासाठी झालेली असते, ऋणानुबंधाशिवाय एखादे रोपही आपल्या अंगणात फुलत नाही. अनंत जन्मांत प्रत्येक जीवाशी होत असलेला एनर्जी एक्सचेंज पुनःपुनः भेटी घडवण्यास कारणीभूत ठरत असतो. कोणास दिलेला अथवा घेतलेला एक रुपयासुद्धा चुकविण्यास पुढील जन्मी यावे लागते, म्हणून शक्यतोवर कोणाचेही ऋण, उधारी आपल्यावर ठेवू नये. आपली ही सत्कर्मे किंवा दुष्कर्मेच पुढे संचितरुपाने आपले प्रारब्ध ठरत जातात.

आपल्या चांगल्या वाईट कर्मांपासून आपली सूटका कधीही नसते, म्हणून हातून घडणारे प्रत्येक कर्म जागृतपणे, परमेश्वराला समर्पित, स्वार्थविरहित, ‘आत्म्यास पटलेले’, सत्याच्या आधारावर असलेलेच घडावे. मनाविरुद्ध, केवळ जगाला दाखवायला, ह्रदय साथ देत नसलेले, चुकीचे कोणतेही कर्म कधीही करु नये.

सत्कर्मांची वाढ झाली की आपल्या नित्य ‘जवळच’ असलेले गुरुतत्त्वं अनुभवास यायला सुरूवात होते, गुरु कधीही ‘करावे’ लागत नाहीत, ते जन्मोजन्मी आपल्या सोबतच असतात! आपल्यातील शिष्य जागा होणं गरजेचं असतं, इतकचं!

एकदा सद्गुरुंचा अनुग्रह प्राप्त झाला, की आपण आपल्या प्रत्येक कर्मास 'सद्गुरार्पण' करावयास शिकतो, मी जे करतोय ते कोणती तरी शक्ती माझ्याकडून करवून घेतेय ही 'विनम्रता' अंगी रुजते आणि मग अर्थातच 'कर्तेपणाचा' अहंकार गळून पडल्याने हातून घडणारे प्रत्येक कर्म ‘अकर्म’ घडून कर्मबंधनातून हळुहळू मुक्त होण्यास आरंभ होतो.

अशाप्रकारे न कळत मोक्षाकडे जाण्याचा प्रवास सुरु होतो.

साप्ताहिक शिक्षक ध्येय 11 डिसेंबर 2023 

वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Popular posts from this blog

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा २०२४

  राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा   राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन! विजेत्यांना पारितोषिक , बालदिनी निकाल   शिक्षक ध्येय, रोटरी क्लब ऑफ यवतमाळ आणि रामशेज शिक्षण संस्था आशेवाडी, तालुका  दिंडोरी जिल्हा नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ‘ ऑनलाइन चित्रकला स्पर्धा – २०२४ ’ साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ ना नफा ना तोटा ’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून विद्यार्थ्यांना चित्र काढण्यासाठी प्रोत्साहन देणे , त्यांच्या कलेचे कौतुक करणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.    ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक , पालक व विद्यार्थी वाचक वर्ग आहे. स्पर्धा आयोजनाचे हे पाचवे वर्ष आहे. राज्यातील विद्यार्थ्यांमधून तीन गटात ही ऑनलाइन चित्रकला स्पर्धा घेतली जाणार आहे. अ गट (इयत्ता पहिली ते पाचवी) ब गट (इयत्ता सहावी ते दहावी)   क गट (इयत्ता अकरावी ते पदवी)          विद्यार्थ्यांमध्...

आदिवासी विकास विभागाची नवीन जाहिरात प्रसिद्ध

  आदिवासी विकास विभागाची नवीन जाहिरात प्रसिद्ध   महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागात आदिवासी विकास निरीक्षक, संशोधन सहायक, लिपिक, शिक्षण विस्तार अधिकारी, अधीक्षक - पुरुष, स्त्री, गृहपाल, ग्रंथपाल, लघुलेखक, प्रोजेक्टर ऑपरेटर इत्यादी विविध पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. आदिवासी विकास विभाग भरती जाहिरात अर्ज सुरवात 12/10/24 शेवटची दिनांक 12/11/2024 जाहिरात काळजीपूर्वक वाचावी...  CLICK HERE.. अर्ज करण्याची लिंक... https://ibpsonline.ibps.in/tdcsep24/ 🪀 मोफत जाहिराती मिळवा.. https://chat.whatsapp.com/JpSNAYKPXA4AyrH2PaKgu0 क्लास प्लस ॲप स्पर्धा परीक्षेसाठी... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

राज्यातील महिलांसाठी कर्तृत्ववान महिला पुरस्कार 2025

  राज्यातील महिलां साठी   कर्तृत्ववान महिला पुरस्कार 2025 राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन ८ मार्च २०२५ जागतिक महिला दिनी निकाल होणार जाहीर शिक्षक ध्येय, मातृसेवा फाउंडेशन ठाणे, श्री. मिलिंद दीक्षित वर्धा, श्री. विलास व्हटकर मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील महिलांसाठी ' कर्तृत्ववान महिला पुरस्कारासाठी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून महिलांच्या कार्याला प्रोत्साहन देणे हाच या स्पर्धेमागील उद्देश आहे.   ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक , पालक आणि विद्यार्थी वाचक आहेत. महिलांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती राज्यातील इतर सर्व नागरिकांना व्हावी याच हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नाविन्यपूर्ण प्रयोगाच्या आधारावर उपक्रमाची निवड केली जाणार असून महिलांच्या कार्याला उत्तेजन देणे , त्यांचे कौतुक करून , प्रोत्साहना सह त्यांच्यातील कर्तृत्व वाढीस लावणे हा या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे. उपक्रम/प्रस्ताव अहवाल लेखनात खालील मुद्दे समा...