LIC ची WhatsApp सेवा सुरु; लगेच ' हा ' नंबर करा सेव्ह
भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) आपल्या ग्राहकांसाठी WhatsApp (व्हॉट्सॲप) सेवा सुरू केली आहे. याद्वारे आता तुम्ही घरी बसून ११ सुविधांचा लाभ घेऊ शकता.
यासाठी तुम्हाला एलआयसी पोर्टलवर पॉलिसीधारकांनी आपली पॉलिसी नोंदणी केली आहे त्यांनीच व्हॉट्सॲप सेवेचा लाभ घेण्यासाठी त्यांच्या व्हॉट्सॲपवरून मोबाईल क्रमांक 8976862090 वर 'HI' असा मेसेज पाठवावा, त्यानंतर ग्राहक 11 पेक्षा जास्त सेवांचा लाभ घेऊ शकतील. स्क्रीनवर सेवांची यादी दिसेल. तुमच्या गरजेनुसार यादीतील पर्यायावर क्लिक करून तुम्ही सेवेचा लाभ घेऊ शकाल.
एलआयसी पोर्टलवर पॉलिसीची नोंदणी कशी करावी?
व्हॉट्सॲप सेवेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी प्रथम एलआयसी पोर्टलवर पॉलिसीची नोंदणी करणे आवश्यक आहे.
- सर्व प्रथम अधिकृत वेबसाइट
CLICK HERE येथे क्लिक करा.
नंतर New User या टॅबवर क्लिक करा, तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड निवडा आणि सर्व आवश्यक माहिती भरा.
- 'ई-सेवा' टॅबवर क्लिक करा आणि तुम्ही तयार केलेला युजर आयडी वापरून लॉग इन करा.
- त्यानंतर दिलेला फॉर्म भरून ई-सेवा वापरण्यासाठी तुमच्या पॉलिसींची नोंदणी करा.
- आता फॉर्म प्रिंट करा आणि त्यावर स्वाक्षरी करा. फॉर्मची स्कॅन केलेली प्रतिमा अपलोड करा.
- पॅन कार्ड किंवा आधार कार्ड किंवा पासपोर्टची स्कॅन कॉपी अपलोड करा.
- एलआयसी कार्यालयांकडून पडताळणी केल्यानंतर तुम्हाला एक ई-मेल आणि एसएमएस पाठवला जाईल. ज्यामध्ये आता तुम्ही आमच्या ई-सेवांचा लाभ घेण्यासाठी तयार आहात, असे लिहिलेले असेल.
- आता सबमिट बटणावर क्लिक करा.
- तुमच्या आवडीचा यूजर आयडी आणि पासवर्ड निवडा आणि सबमिट करा.
- लॉगिन करा आणि 'मूलभूत सेवा' वर क्लिक करा त्यानंतर 'पॉलिसी जोडा' पर्याय निवडा.
- आता तुमच्या सर्व पॉलिसींची नोंदणी करा
.