१४ व १५ डिसेंबरला पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा
१० वी, १२ वी, ट्रेनी, ग्रॅज्युएट - (पदवी), पदविका, बिझनेस डेव्हलपमेंट एक्सेक्युटीव्ह, केमिस्ट, नर्सिंग, बी.एस.सी., एम.एस.सी. अशा प्रकारची एकुण ४७५ पेक्षा जास्त नोकरीच्या संधी
सोलापूर जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर यांचे मार्फत दिनांक १४ व १५ डिसेंबर २०२२ रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे, अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकताचे सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी दिली.
या रोजगार मेळाव्यात १० वी, १२ वी, ट्रेनी, ग्रॅज्युएट - (पदवी), पदविका, बिझनेस डेव्हलपमेंट एक्सेक्युटीव्ह, केमिस्ट, नर्सिंग, बी.एस.सी., एम.एस.सी. अशा प्रकारची एकुण ४७५ पेक्षा जास्त रिक्तपदे उद्योजकांनी या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अधिसुचीत केलेली आहेत.
नोकरी इच्छुक उमेदवारांनी खालील संकेतस्थळावर...
https://rojgar.mahaswayam.gov.in
नोंदणी पूर्ण करून शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी ऑनलाईन अर्ज करावेत, जेणेकरून त्यांना मेळाव्यात सहभागी होता येईल. याबाबत काही अडचण आल्यास कार्यालयाच्या ०२१७-२९५०९५६ या दुरध्वनीवर अथवा प्रत्यक्ष जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नॉर्थ कोट, पार्क चौक, सोलापुर येथे संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त जाधव यांनी केले आहे.
शैक्षणिक माहितीसाठी/नोकरीच्या जाहिरातीसाठी आजच आमच्या ग्रुपला जॉईन व्हा...
https://chat.whatsapp.com/IxyzqNxw3FY9S5NP9KUUuO
शिक्षक ध्येय विद्यार्थ्यांचा एकमेव मार्गदर्शक..