ITI: शिक्षक परीक्षा आणि निकाल अपडेट
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र शासन
राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (Govt ITI) मधील शिल्पनिदेशक गट क संवर्गातील पद भरतीची ऑनलाइन परीक्षा दिनांक 28 व 29 सप्टेंबर 2022 रोजी घेण्यात आली होती.
त्यानंतर 4 ऑक्टोबर रोजी उत्तर सूची जाहीर करण्यात आली.
ITI इंस्ट्रक्टर परीक्षा आणि त्याचे निकाल अपडेट :
काही ITI उमेदवारांनी औरंगाबाद मॅट मध्ये केलेल्या याचिकेत, फक्त 'CITS उमेदवारांनाच या पदासाठी पात्र करावे' अशी मागणी करण्यात आली होती. पूर्व परिक्षा झाली असून प्रश्न पत्रिकेवर आक्षेपही मागविले असून, निकालानंतर मुख्य परीक्षा घेण्यात येणार असल्याचे DVET तर्फे सांगण्यात आले. दोन्ही पक्षांनी आपले तथ्य सादर केले, सुनावणी दरम्यान मा. न्यायालयाने सर्व तथ्य तपासले.
दिनांक ०६/१०/२०२२ पासून, प्रश्नांवरील आक्षेपांच्या तपासनीस ०३ आठवडे लागणार असल्याने त्यानंतर पूर्वचा निकाल जाहीर करण्यात येईल असे DVET तर्फे सुनावणीत सांगण्यात आले, त्यामुळे सदर मॅटरचा निर्णय घेण्यास पुरेसा वेळ उपलब्ध असून दिवाळी नंतर दिनांक : ०७/११/२२ रोजी पुढील सुनावणी घेऊ असे न्यायालयाने सांगितले.
पुढील सुनावणी पर्यंत फक्त प्रश्नांवरील आक्षेपांवर योग्य ती कार्यवाही करावी, निकाल जाहीर करू नये असे आदेश मा. न्यायालयाने दिले. त्यामुळे दिनांक : ०७/११/२०२२ पर्यंत या पूर्व परीक्षेच्या निकालावर एक प्रकारचा स्टे कोर्टाने दिला आहे. निकाल, पात्रता, मुख्य परीक्षा कोण देऊ शकेल, कधी असेल इत्यादी बाबी न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून असतील. म्हणून किमान ०७/११/२२ पर्यंत मुख्य परिक्षा होणार नाही याची नोंद उमेदवारांनी घ्यावी.
शैक्षणिक माहिती आणि नोकरीच्या जाहिरातीसाठी आजच जॉईन व्हा..
https://chat.whatsapp.com/LxTAheg1fXLLYs7cURrA13