साप्ताहिक शिक्षक ध्येय
दसरा विशेषांक
वर्ष ३ रे; अंक २४ वा; ५ ऑक्टोबर २०२२
★ शिक्षक ध्येय: विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांचे एकमेव राज्यस्तरीय मुक्त व्यासपीठ...
*_शिक्षक ध्येय ऍप_*
लिंकवर क्लीक करून आपले ओळखपत्र आजच मिळवा...
https://kutumb.app/shikshak-dhyeyy?ref=M9MK9
*_यु ट्यूब चॅनल_*
https://youtube.com/channel/UCLjlQxY3bKkvVNgbjuiR6tQ
*_ब्लॉग:_*
https://kaushalyavikas.blogspot.com
*_टेलीग्राम:_*
*_इंस्टाग्राम:_*
https://instagram.com/shikshakdhyey?igshid=974vqiuhm8ln
*_फेसबुक:_*
https://www.facebook.com/madhukar.ghaydar.1
*_फेसबुक पेज:_*
https://www.facebook.com/Shikshak_Dhyey-111156460583068/
*_फेसबुक पब्लिक ग्रुप:_*
https://www.facebook.com/groups/847327682432916/?ref=share
*_ट्विटर_*
https://twitter.com/ShikshakDhyey?s=08
*_लिंकडीन_*
https://www.linkedin.com/in/madhukar-ghaydar-59b13889
*_ई मेल:_*
*_व्हाट्सअॅप ग्रुप:_*
https://chat.whatsapp.com/HOOlCKUkOLMC4hxFDRcNeA
*_Follow on the Koo App_*
*साप्ताहिक शिक्षक ध्येय*
_राज्यस्तरीय नेटवर्क: 153 व्हाट्सएप ग्रुप त्यात सुमारे 45,800 सदस्य; शिक्षक ध्येय ऍप 24,231 सदस्य; 141 उपसंपादक/प्रतिनिधी ; फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम, ब्लॉग ; वाचकवर्ग - शिक्षक, पालक, विद्यार्थी_
*शिक्षक ध्येय®: विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच ध्येय* 👇
https://kutumbapp.page.link/U2t4uPGTqWkDW4pp8
वार्षिक वर्गणी 500 रुपये
वर्षभरात 52 अंक - दर सोमवारी प्रसिद्ध होतो
संपर्क : 96 23 23 71 35
विजयादशमी
विजयादशमी म्हणजेच आश्विन शुद्ध दशमी. हा दिवस दसरा म्हणून साजरा
केला जातो. देवीच्या घटांची स्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीचे
नवरात्र साजरे होते. आणि दहाव्या दिवशी विजयादशमी साजरी करण्यात येते. विद्येची
देवता मानल्या गेलेल्या सरस्वती देवीचे पूजन या दिवशी विशेषत्वाने केले जाते. या
दिवशी अपराजिता देवीचीही पूजा करतात. अपराजिता देवी युद्धाचे द्योतक मानले जाते.
महाराष्ट्रात दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने 'सोने' म्हणून
वाटली जातात. त्यादिवशी शमीपूजन आणि शास्त्रास्त्र पूजाही करतात. विद्यार्थी आणि
व्यापारी लोक आपल्या वह्या, पुस्तकांचे पूजन करतात. लहान
मुले दगडी पाटीवर सरस्वतीचे प्रतिकात्मक चित्र काढून तिची पूजा करतात.
महाराष्ट्रात शस्त्रपूजा नि शेतीतील लोखंडे अवजारांची पूजा होते.
देवीच्या प्रतिमेपुढे मातीमध्ये नवीन उगवलेले धान्य पेरले जाते आणि त्याच्यावर घट
बसवून नऊ दिवस त्याची पूजा केली जाते. नऊ दिवसानंतर ते उगवलेले धान्य शेतात नेऊन
पुन्हा पेरले जाते.
घराला आंब्याच्या पानांचे आणि झेंडूच्या फुलांचे तोरण लावतात.
दसऱ्याला झेंडूच्या फुलांनी पूजा करण्याची प्रथा आहे. यंत्रे, वाहने
यांना झेंडूच्या फुलांच्या माळा घालतात. पुरणपोळीचा, गोडधोडाचा
नैवेद्य देवीला दाखवला जातो. अष्टमीला कडाकणी आणि थालीपीठ यांचा नैवेद्य दाखवला
जातो. नवमीला मोठा यज्ञ करून त्यात नारळ अर्पण केला जातो आणि देवीची खणा-नारळाने
ओटी भरली जाते.
नवव्या दिवशी घट हलवून नऊ दिवसाचा उपवास सोडला जातो. दहाव्या दिवशी दसरा साजरा केला जातो.
इतिहास शिक्षक ध्येय चा... नक्की वाचा....
राज्यातील अनेक शाळांत जे जे चांगले घडत आहे, परिवर्तन दिसत आहे, विद्यार्थी यशाची शिखरे सर करीत आहे, येथील शिक्षक नवीन उपक्रम राबवीत कुठल्याही प्रसिद्धीची अपेक्षा न बाळगता विद्यार्थ्यांसाठी अहोरात्र झटत आहे, यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा यथोचित गौरव व्हावा, उत्कृष्ठ शाळेतील आजचे खरे वास्तव समाजासमोर यावे यासाठीच कुठेतरी शिक्षकांना एक राज्यस्तरीय व्यासपीठ असावे असे मनोमन वाटले. म्हणून मी असे ठरविले की, राज्यातील सर्व शिक्षकांना एकत्रित करायचे, एकाच व्यासपीठावर त्यांना आणायचे आणि प्रत्येकाच्या शाळेत काय काय सुरू आहे याचा वेध घ्यायचा.
यातून २० एप्रिल २०२० रोजी ‘शिक्षक ध्येय’ साप्ताहिकाचा जन्म झाला.
मी आठवड्यातून एकदा दर सोमवारी डिजिटल साप्ताहिक तयार करून शिक्षक मित्रांना पाठवू लागलो आणि बघता बघता आज राज्यातील लाखो शिक्षक या साप्ताहिकाशी जोडले गेले आहेत. दैनिकातील बातमी जिल्हाबाहेर शिक्षकांपर्यंत पोहचत नव्हती, नेमकी हीच समस्या लक्षात घेऊन त्यावर उपाय शोधण्याची धडपड सुरू होती आणि त्यातूनच शिक्षकांनी केलेल्या उत्कृष्ठ कार्याला, नवोपक्रमाला एक राज्यस्तरीय मुक्त व्यासपीठ निर्माण होत आहे.
आज शिक्षकांसाठी एका राज्यस्तरीय मुक्त व्यासपीठाची गरज होती आणि शिक्षक ध्येय साप्ताहिकाच्या माध्यमातून ती पूर्ण होत आहे.. दोन वर्ष पूर्ण करून आजचा वर्षे ३ रे अंक 24 वा दिनांक 5 ऑक्टोबर २०२२ रोजी प्रसिद्ध केला आहे. राज्यातील १५० शिक्षक संपादकीय मंडळात कार्यरत आहे. त्यात पालक आणि विद्यार्थ्यांचा देखील समावेश आहे. या साप्ताहिकाला विद्या प्राधिकरण पुणे, यांच्या तर्फे आयोजित नवोपक्रम स्पर्धेत 'पारितोषिक' देखील मिळाले आहे.
दसरा विशेषांक वाचण्यासाठी...