देश,
समाज, वर्तमान, वास्तव, स्वप्न, भविष्य, व्यक्तीगत
विकास यांना आकार देण्याचे खरे सामर्थ्य शिक्षणामध्ये आहे. शस्त्राने, पैश्याने, सत्तेने, कायद्याने
माणूस घडविता येत नाही पण फक्त शिक्षणानेच हे शक्य आहे ते ते घडवू शकतो फक्त एक
आदर्श शिक्षकच.
खरे शिक्षण माणसातील सर्वांगीण
गुणांचा, कौशल्यांचा विकास करते. ज्या शिक्षणातून संस्कार संपन्न पिढी घडते, विचार समृद्ध होतात, राष्ट्राप्रती प्रेम निर्माण
होते तेच यशस्वी शिक्षण होय. जर्मनी, स्वीडन, जपान हे देश शिक्षणावर सर्वाधिक खर्च करतात. आपल्याकडे राष्ट्रीय
उत्पन्नाच्या साडे तीन टक्के खर्च केला जातो त्यात आता वाढ व्हायला हवी.
आजचा विस्कटलेला वर्तमान आणि अंधारमय
भविष्यकाळ यांना आकार देण्यासाठी आवश्यक असणारे उत्कृष्ठ शिक्षण देणारा शिक्षक कसा
असावा?
अध्यापन केवळ उपजीविकेचे साधन नसून एक
धर्म आहे, उपासना आहे. शिक्षण म्हणजे केवळ शब्द वाचन, चार
गणिते, धडे, कविता शिकविणारी शाळा नसून
एक संस्कारक्षम पिढी घडविणारी प्रयोगशाळा आहे. ही प्रयोगशाळा चालविण्यासाठी आम्हाला
साधक हवा फक्त शिक्षक नको. विनोबांच्या मते, शिक्षक
विद्यार्थिनिष्ठ असावा, विद्यार्थी ज्ञाननिष्ठ असावा, ज्ञान समाजनिष्ठ असावे. आदर्श शिक्षक सहवास, संवाद, आचरण, चारित्र्य
यांच्या माध्यमातून आदर्श आणि कर्तबगार नागरिक घडवित असतो. पाठ्यपुस्तकाबरोबरच
जगाचे ज्ञान शिकवित असतो.
विद्यार्थ्यांच्या स्मरणात कायम राहावे असे वाटत असेल तर शिक्षकाने
जाणीवपूर्वक यासाठी प्रयत्न करायला हवे. फक्त लेखी परीक्षेपुरताच विचार न करता शिक्षकांनी
शिकविण्याची प्रक्रिया विकसित केली पाहिजे, जेणेकरून विद्यार्थी त्यात एकरूप झालाच पाहिजे.
त्यामुळे विद्यार्थ्यांच्या येणा-या तक्रारी दूर होतील. पण, असे होत आहे का?
प्रत्येक शिक्षकाने काळानुरुप आपल्या कल्पकतेने अध्यापनात नावीन्यपूर्ण बदल करणे
आवश्यक आहे.
अध्यापनाची ठराविक योग्य दिशा ठरवायला हवी. अध्यापनाच्या
सर्वांगाचा विचार करायला हवा. अध्ययन अध्यापनाच्या सिमा,
कालावधी, विद्यार्थ्यांची मानसिकता, स्वनिर्मित शैक्षणिक साहित्य, स्वयंअध्ययन कार्डे,
स्वाध्याय कार्डे, पी. डी.
एफ, शैक्षणिक व्हिडिओ, पी.
पी. टी., शिक्षकाची वेशभूषा, पुर्वाभ्यास, पूरक वाचन साहित्य, ज्ञानरचनावाद, तंत्रज्ञान, सादरीकरणातील
सहजता, सुत्रबद्धता, अध्यापनाची भाषा,
एकंदरच आचारसंहिता आणि अध्ययन अनुभवांची व्याप्ती असा सर्वांगाने नियोजन
आराखडा करायला हवा. आजचा शिक्षक हा तंत्रस्नेही असणे फार
गरजेचे आहे तसेच विद्यार्थ्याची मानसिकता, कौटुंबिक परिस्थिती,
भौगोलिक वातावरण, भाषिक स्थिती, वैचारिक पातळी या सर्व गोष्टींचा शिक्षकाने आज विचार करणे गरजेचे आहे.
भावी पिढीचे शिल्पकार होण्याचे भाग्य आपणाला
लाभले.
आपण दिलेल्या ज्ञानशिदोरीचा विद्यार्थ्यांवर त्यांच्या भौगोलिक-कौटुंबिक वातावरणापेक्षा जास्त परिणाम होतो. विद्यार्थ्यांना
विविध जीवनकौशल्ये, व्यवसाय कौशल्ये आत्मसात करण्यासाठी सक्षम
बनविणे हेच खरे शिक्षण. आजुबाजूच्या समाजाची, त्यांच्या गरजांचा विचार करण्याची सवय विद्यार्थ्यांना लावायला हवी.
आपला विद्यार्थी पुढे मोठ्या पदाला गेल्यानंतर प्रथम आठवण करतो तो आपल्या शिक्षकांची. त्याच्या काळजावर शिक्षकाचे नाव कायमस्वरूपी कोरलेले असते. त्यात आपले नाव असावे असे आपणास वाटते का?
आजचा डिजिटल शिक्षक ध्येय अंक pdf वाचण्यासाठी इथे क्लिक करा CLICK HERE
किंवा वरील मुखपृष्ठावर क्लिक करून देखील आपण अंक वाचू शकता...