... राजीनामा नामंजूर
ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी शिक्षकपदाचा दिलेला राजीनामा सोलापूर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने प्रशासकीय कारणास्तव नामंजूर केला आहे.
दिनांक 12 जुलै 2022 ची 'शिक्षक ध्येय' मधील बातमी....
ग्लोबल टिचर रणजितसिंह डिसले यांचा राजीनामा...
ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते शिक्षक रणजीतसिंह डिसले यांनी आपला 'जिल्हा परिषद शिक्षक' पदाचा राजीनामा प्राथमिक शिक्षण विभागाकडे सोपविला असल्याचे वृत्त समोर आलं आहे.
राजीनामा अर्जात त्यांनी काहीच कारण नमूद केलेले नाही.
त्यांनी अमेरिकेत फेलोशिपला जाण्यासाठी रजा मागितली होती परंतु अपूर्ण कागदपत्राअभावी त्यांचा अर्ज प्रलंबित होता. पण त्यावेळी त्यांची रजा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या आदेशाने मंजूर झाली होती.
ते पुढील शिक्षणासाठी 8 ऑगस्ट रोजी अमेरिकेत जाणार होते.
दरम्यान 2022 च्या जानेवारी महिन्यात शिक्षण विभागाने तब्बल 3 वर्षे डिसले गुरुजी अनुपस्थित असल्याचा आरोप केला होता. शिक्षण विभाग व त्यांच्यातील झालेल्या वादामुळे राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे.
पण राजीनामा मागे घेण्यासाठी तीन महिन्यांची मुदत असते, आता शिक्षण विभाग त्यांचा राजीनामा मंजूर करतो की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
https://kaushalyavikas.blogspot.com/2022/07/blog-post_39.html?m=1