आपले ‘ई-इन्शुरन्स’ खाते आहे का?
घरबसल्या मोबाईलवर 5 मिनिटांत फ्री ‘ई-इन्शुरन्स’ खाते उघडा..
विमा नियामक व विकास प्राधिकरणाने (इरडा) ग्राहकांना ‘ई-इन्शुरन्स’ खाते बाळगणे बंधनकारक केले आहे.
ग्राहकांकडील सर्व पॉलिसींचे एकत्रीकरण करणे आणि भविष्यात दाव्याची प्रक्रिया अधिक सुलभ करणे हा सरकारचा प्रमुख उद्देश आहे.
यासाठी कोणताही अतिरिक्त खर्च येत नाही. हे खाते उघडल्यानंतर तुमच्या सर्व पॉलिसी एकाच ठिकाणी ठेवता येतात. त्यामुळे सर्व पॉलिसींचा एकत्रितरित्या आढावा घेणे किंवा एखादा दावा करताना सर्व कागदपत्रे सांभाळून ठेवणे शक्य होणार आहे. या शिवाय कधीही आणि केव्हाही संबंधित विमा कंपनीकडे जाताना पॉलिसीविषयक कागदपत्रे जवळ बाळगण्याची आवश्यकताही भासणार नाही. संबंधित ग्राहकांनी केलेल्या तक्रारी तक्रार निवारण केंद्रापर्यंत ऑनलाइनद्वारे पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण काम या माध्यमातून केले जाते. तक्रारीचे निवारण करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तताही ‘ई-इन्शुरन्स’ खात्याद्वारे केले जाते.
‘ई-इन्शुरन्स’ खात्याचा दुसरा फायदा म्हणजे ‘ई-केवायसी’ची प्रक्रिया सुलभरित्या करता येते.
‘ई-इन्शुरन्स’ खाते कसे उघडावे?
लॉग इन करण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरावा. या अर्जासमवेत ‘केवायसी’ची पूर्तता करणारी कागदपत्रे जोडावीत. ई-खाते उघडण्यासाठी ‘आधार कार्ड’ किंवा ‘पॅन कार्ड’या पैकी एक पुरावा सादर करणे आवश्यक आहे.
तुमचे ई-इन्शुरन्स खाते तयार होते. खाते उघडले गेल्यानंतर ग्राहकाला ‘वेलकम कीट’ देण्यात येते. खात्याचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड ग्राहकाला ई-मेल’च्या माध्यमातून पाठवला जातो. त्यानंतर तुम्ही रिपॉजिटरीच्या वेबसाइटवर जाऊन लॉग इन आणि पासवर्डच्या माध्यमातून स्वतःचे खाते नियंत्रित करू शकता.
‘ई-इन्शुरन्स’ खाते ही नवीन संकल्पना आहे. अतिशय कमी वेळात पॉलिसी मिळवणे किंवा तिचा क्लेम प्राप्त करणे ग्राहकाला सहज शक्य आहे.
Join us
https://chat.whatsapp.com/K7ypNTXJUS66inEaX4QJ81