सार्वजनिक ठिकाणी मोबाईल चार्ज करु नका... अन्यथा...
... बँक खाते रिकामे होऊ शकते.
अनेकदा आपण आपला मोबाईल, लॅपटॉप, टॅबलेट हे रेल्वे स्टेशन, एअरपोर्ट किंवा हॉटेल या सारख्या सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेल्या चार्जिंग केबल किंवा यूएसबी पोर्टद्वारे चार्ज करतो. मात्र अश्या वेळी..
'ज्यूस जॅकिंग' या
संकल्पनेद्वारे हा डेटा चोरीस जाण्याची भीती असते. त्यासाठी हॅकर्सनी सार्वजनिक वापराची ठिकाणं टार्गेट केलेली आहेत. याबाबत नुकतेच स्टेट बँक ऑफ इंडियाने ट्वीटरहून एका ट्वीटद्वारे आपल्या ग्राहकांना सतर्क केले आहे.
ज्यूस जॅकिंग म्हणजे काय?
एखाद्या सार्वजनिक ठिकाणी असलेल्या चार्जिंग युएसबी पोर्टद्वारे कनेक्ट केलेल्या मोबाइल अथवा डिव्हाइसमधून मालवेअरच्या सहाय्याने माहिती चोरणे म्हणजे 'ज्यूस जॅकिंग' होय. यासाठी हार्डवेअरचा उपयोग केला जातो. कधी कधी तर तुमचा फोन, लॅपटॉप देखील कायमस्वरूपी लॉक होऊ शकतो. जगभरातील मोठमोठे हॅकर सार्वजनिक यूएसबी आणि केबलमध्ये मालवेअर लावून लोकांची खाजगी माहिती चोरी करत आहे. याला ज्यूस जँकिंग असे म्हटले जाते.
सायबर विशेषज्ञांचे म्हणणे आहे की, जेव्हा लोक सार्वजनिक यूएसबी पोर्ट अथवा केबलद्वारे फोन, लॅपटॉपसारखे डिव्हाईस चार्जिंग करतात, त्यावेळी मालवेअर सर्व माहिती हॅकरपर्यंत पोहचवतो. ज्याप्रकारे एटीएम हॅकर्स डेबिट कार्डची माहिती चोरी करतात. त्याचप्रकारे यूएसबी चार्जिंग पोर्टमध्ये हार्डवेअर लावून डाटा चोरी केला जातो.
यापासून वाचण्यासाठी रेल्वे, विमान अथवा हॉटेल याठिकाणी आधीपासूनच लागलेल्या चार्जिंग केबलचा वापर करू नका.
अशी घ्या काळजी...
सार्वजनिक ठिकाणी चार्जिंग करणे शक्यतो टाळावे किंवा तेथे स्वतःच्या चार्जर आणि केबलचाच वापर करावा.