WhatsApp अलर्ट :
उत्तर देऊ नका... 'या' नंबरवरून मेसेज आल्यास...
अन्यथा तुमचे बँक खाते रिकामे होईल
सद्या प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये सर्वाधिक वापर WhatsApp चा होतो आहे.
लहान, मोठे, स्त्री, पुरुष, सर्व जण व्हाट्सएपचा वापर करत आहे.
पण आता सावधान!!! WhatsApp Scam पासून..
+923060373744 या नंबर वरून कोणत्याही प्रकारचा मेसेज आल्यास, त्यास उत्तर देऊ नका.
आपणास 50 लाख रुपयांची लॉटरी लागली आहे. हे पैसे तुमच्या अकाउंटवर लगेच जमा होतील फक्त त्यासाठी असे करा... अशा सूचना... असतील, व 07666533352 या नंबरवर कॉल करा असे मेसेजमध्ये लिहिलेले असेल.
काही वेळेस व्हाईस नोट देखील पाठविली जात आहे.
उदा. “OMG! See this now. link” or “OMG!! Have you seen this?” अशा मेसेजला कोणतेही उत्तर देऊ नका... अन्यथा तुमचे बँक अकाऊंट रिकामे होऊ शकते... सावधान!
अशी काळजी घ्या...
1. अनोळखी नंबर वरून आलेल्या फसव्या मेसेजला उत्तर देऊ नका किंवा स्पॅम मेसेज लिंक वर क्लीक करू नका.
2. गैर भारतीय नंबर वापरून आलेला मेसेज लगेच डिलीट करावा व तो नंबर ब्लॉक करा.
3. पिन नंबर अथवा ओ टी पी कुणा सोबत शेअर करू नका.
4. तुमच्याकडे जर असे मेसेज आले तर ते इतर कोणालाही फॉरवर्ड करू नका.
5. चुकून काही गडबड झाल्यास लगेच आपला मोबाईल बंद - स्विच ऑफ- करावा.
6. आपली फसवणूक झाल्यास पोलिसांची, सायबर सेलची मदत घ्या.