कोणताही ट्रेड घेऊन ITI उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आता थेट सेकंड इयर पॉलिटेक्निकला कोणत्याही शाखेत प्रवेश
आयटीआयचे शिक्षण कोणत्याही ट्रेडमधून पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता पॉलिटेक्निकच्या दुसऱ्या वर्षात कोणत्याही शाखेत थेट प्रवेश मिळणार आहे, तसेच पॉलिटेक्निकचे ऑनलाइन प्रवेश अर्ज दहावीचा निकाल लागण्याच्या १५ दिवस आधी विद्यार्थी भरू शकतील, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.
आज पॉलिटेक्निक अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया २०२२-२३ ऑनलाइन प्रणाली संकेतस्थळाचे उदघाटन शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
पॉलिटेक्निक मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाच्या यंदा तीन फेऱ्या असणार आहेत.