आपल्या देशात ऑनलाईन फसवणुकीच्या सर्वाधिक घटना मोबाईलच्या क्यूआर कोडमुळे (QR) घडल्या आहेत. क्यूआर कोड फसवणुकीचे वाढते प्रमाण लक्षात घेता देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने ४४ कोटींहून अधिक ग्राहकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. बँकेने म्हटले आहे की, जर तुम्हाला कोणत्याही व्यक्तीकडून क्यूआर कोड मिळाला, तर तो चुकूनही स्कॅन करू नका. असे केल्याने तुमच्या खात्यातून पैसे काढले जाऊ शकतात.
एसबीआयने ट्विटद्वारे ग्राहकांना सतर्क केले आहे. बँकेने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला क्यूआर कोड स्कॅन करण्याची गरज नाही.
अशी होते QR कोड फसवणूक?
SBI ने सांगितले की QR कोड नेहमी पेमेंट करण्यासाठी वापरला जातो पेमेंट प्राप्त करण्यासाठी नाही. म्हणून, पेमेंट प्राप्त करण्याच्या नावाखाली कधीही QR कोड स्कॅन करू नका. यामुळे तुमचे खाते रिकामे होऊ शकते. SBI नुसार, तुम्ही पैसे प्राप्त करण्यासाठी QR कोड स्कॅन करता तेव्हा तुम्हाला पैसे मिळत नाहीत. बँक खात्यातून पैसे काढल्याचा मेसेज येतो.
Comments
Post a Comment