तुमचे आधार कार्ड कुठे आणि किती वेळा वापरले गेले आहे?
घरबसल्या मोबाईल द्वारे चेक करा फक्त
5 मिनिटांत....
आधार कार्ड प्रत्येक शासकीय कामांमध्ये प्रमुख कागदपत्र म्हणून वापरले जाते. सद्या आधार कार्डचा वापर प्रत्येक ठिकाणी अनिवार्य करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत आपण प्रत्येक ठिकाणी आधार कार्डची झेरॉक्स देत असतो.
परंतु या झेरॉक्सचा गैरवापर तर होत नाही ना?
आता तुम्ही चेक करू शकता की तुमचे आधार कार्ड कोठे, कोणत्या दिवशी तसेच काय कामासाठी वापरले गेले आहे. ही सर्व माहिती तुम्ही घरी बसून तुमच्या मोबाईलच्या मदतीने चेक करू शकता....
सविस्तरपणे वाचा....
1. आता तुमचा आधार क्रमांक आणि सिक्युरिटी कोड टाका.
2. त्यानंतर 'जनरेट ओटीपी' वर क्लिक करा.
3. ओटीपी टाकल्यानंतर माहितीचा कालावधी आणि व्यवहारांची संख्या (ट्रान्जॅक्शन) द्यावी लागेल.
4. आता निवडलेल्या कालावधीसाठी प्रमाणीकरण (ऑथेंटिकेशन) विनंतीचे तपशील स्क्रीनवर दिसून येतील.
5. तुम्हाला तुमच्या आधार कार्डच्या वापरामध्ये काही संशय आल्यास तुम्ही यूआयडीएआय टोल फ्री क्रमांक - १९४७ वर किंवा help@uidai.gov.in येथे ईमेलद्वारे संपर्क साधू शकता.
येथे एक व्हिडीओ देण्यात आला आहे गरज पडल्यास व्हिडिओ बघावा...
Comments
Post a Comment